या पुस्तकामध्ये लेखकाच्या अनुभवसमृद्ध जीवनातून तयार झालेल्या वैचारिक धारणा व्यक्त झाल्या आहेत.
संवेदनशीलता, सजगता, अनुभवसंपन्नता, तसेच विचारांचे सहजसुलभ प्रगटीकरण ही ललितलेख संग्रहाची वैशिष्ट्ये आहेत.
या पुस्तकातील विचारांची मांडणी विविध विषयानुषंगाने झाली असली, तरीही त्यातून व्यक्त होणार्या मानव्याचा ‘एकसमान’ गोफ त्यात विणलेला दिसतो.
लेखकाच्या विचारांचा विणला गेलेला हा सुंदर गोफ रसिकवाचकांना वाचनाचा आनंद देण्यासोबतच विचारप्रवृत्त आणि अंतर्मुख करणाराही आहे.