‘आत्म-प्रकाश’ हे जेष्ठ लेखक संजय आर्वीकर यांचं नवीन पुस्तक. यात एकूण चार विभगात १२ रोचक आणि आपापल्या क्षेत्रात उत्तुंग कामिगिरी करत अमिट ठसा उमटवणाऱ्या व्यक्तीमत्त्वांच्या आत्मचरित्र किंवा चरित्रात्मक पुस्तकांवर / लिखाणावर अर्विकरांनी केलेल्या नोंदी लेख स्वरुपात एकत्रित केलेल्या आहेत. एका अर्थाने हे पुस्तक पुस्तकांवरचे पुस्तक म्हणता येईल पण त्याची मांडणी त्या प्रकारातल्या इतर पुस्तकांसारखी नाही. इथले लेख त्या-त्या व्यक्तीमत्त्वांच्या चरित्राची मांडणी करतात, त्यासाठी त्या-त्या कर्त्याच्या पुस्तकांचा आधार घेतातच पण त्याहीपेक्षा काही अधिकचे इतर संदर्भदेखील लेखक वापरतात. त्यामुळे हे लिखाण चरित्रात्मक लिखाण आहे असं देखील म्हणता येऊ शकतं, पण पुन्हा या लेखांची मांडणी पूर्णत: चरित्रात्मक लिखाणाच्या पद्धतीची नाही. आर्वीकर या व्यक्तीमत्त्वांच्या ‘स्व’ च्या शोधाची, त्या प्रवासाची मांडणी त्यांच्या शैलीत करतात ज्याला लेख याव्यतिरिक्त नेमकं असं लेबल आपल्याला लावता येत नाही. हे पुस्तक वाचल्यावर त्या त्या व्यक्तीमत्त्वांविषयी एक वेगळा दृष्टीकोन वाचकांना मिळतोच पण त्यांची पुस्तकं, चरित्र वाचण्यासाठीची वेगळी दृष्टीदेखील मिळते.
‘Atma-Prakash’ is a new book by senior author Sanjay Arvikar. It consists of twelve fascinating notes compiled in four sections, shedding light on individuals who have made remarkable contributions in their respective fields. Arvikar’s annotations on autobiographies or biographical books are gathered here in the form of essays. In a sense, this book may be called a book about books, but its approach is not quite like other books of its kind. While the essays here analyze the characters of various personalities, they draw not only from the works of those individuals but also from a wider range of references. Hence, this writing is considered biographical, yet it encompasses more than just character-based writing. Arvikar delves into the exploration of the ‘self’ of these personalities, reflecting his journey in a style that cannot be labeled anything other than unique. Upon reading this book, readers gain a different perspective on various personalities, as well as a unique approach to reading characters.