आपलं ध्येय गाठण्याच्या प्रवासात अशा अनेक गोष्टी अथवा व्यक्ती भोवताली असतात, ज्या आपल्या ‘आधार’ होऊन जातात. त्यांच्या साहाय्याने प्रेरित होऊन आपण आपली वाटचाल कशी करू शकतो, हे सांगणारे पुस्तक.
सर्वत्र अंधकार पसरला आहे. असं वाटत असताना आशेचा सकारात्मक किरण दाखवणार्या आधारांविषयीचे समग्र विवेचन ह्या पुस्तकात आले आहे.
मानसिक वादळातही स्थिरता टिकवून ठेवण्यासाठी मदत करणार्या आश्चर्यकारक आधारांचे महत्त्व सांगणारे पुस्तक.
स्वत:चे आश्चर्यकारक आधार निर्माण करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करणारं पुस्तक.
इतिहास निर्माण करणार्यांच्या यादीत स्वत:चं नाव समाविष्ट व्हावं हे ज्यांना वाटतं, त्या सर्वांसाठी महत्त्वाचं असं एकमेव पुस्तक.