अंदमान म्हटले की तिथला सेल्युलर जेल आणि तिथे काळ्या पाण्याची शिक्षा भोगायला पाठवलेले क्रांतिकारक आठवतात. अंदमान हे भारतीय स्वातंत्र्यसैनिकांचे क्रांतितीर्थ ! भगतसिंहांचे सहकारी विजयकुमार सिन्हा अंदमानला ‘भारताचे बॅस्टील’ म्हणतात. बॅस्टील हा फ्रेंच राज्यक्रांतीचे प्रतीक बनलेला तुरुंग. बॅस्टीलच्या तुरुंगात डांबण्यात आलेल्या फ्रेंच क्रांतिकारकांनी सरंजामशाहीची कबर खणत स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव ही मूल्ये उद्घोषित केली. फ्रान्ससाठी जसा बॅस्टीलचा तुरुंग तसा भारतासाठी अंदमानचा तुरुंग ! अंदमानच्या या तुरुंगात शेकडो क्रांतिकारकांना डांबण्यात आले होते. पण या तुरुंगातदेखील हे क्रांतिकारक लढत होते, जसे फ्रेंच क्रांतिकारक बॅस्टीलमध्ये लढत होते. फ्रेंच क्रांतिकारकांनी बॅस्टीलचा तुरुंग फोडला तर अंदमानात डांबण्यात आलेल्या क्रांतिकारकांनी चिवट अन्नसत्याग्रह करून ब्रिटिश साम्राज्यशाहीला वाकायला भाग पाडले. त्यासाठी महावीर, मोहित आणि मोहन यांना बलिदान करावे लागले. अंदमानच्या तुरुंगातदेखील जराही न वाकता देदीप्यमान लढा देणाऱ्या क्रांतिकारकांची ही कथा म्हणजे विजयकुमार सिन्हा यांनी लिहिलेले, ‘In Andamans, the Indian Bastille’ हे पुस्तक. त्या पुस्तकातील गोष्ट मराठी वाचकांना सांगण्याचा हा प्रयत्न.
“Dhurandhar: Peshwa Nanasaheb | धुरंधर: पेशवा नानासाहेब” has been added to your cart. View cart
Andamanatil Krantikarak | अंदमानातील क्रांतिकारक
Related products
-
History
Chhawa | छावा
₹750.00Original price was: ₹750.00.₹675.00Current price is: ₹675.00. Add to cart -
Criticism
Lokmanya Tilak Aani Mahatma Gandhi: Netrutvachi Sandhejod | लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी: नेतृत्वाची सांधेजोड
₹250.00Original price was: ₹250.00.₹225.00Current price is: ₹225.00. Add to cart -
History
Purandare: Athravya Shatkatil Ek Kartbgar Gharane | पुरंदरे: अठराव्या शतकातील एक कर्तबगार घराणे
₹290.00Original price was: ₹290.00.₹261.00Current price is: ₹261.00. Add to cart -
History
Asa Lutala Bharat | असा लुटला भारत
₹350.00Original price was: ₹350.00.₹315.00Current price is: ₹315.00. Add to cart