जागतिक साहित्यात प्रचंड मोठा ठसा उमटवणाऱ्या अरेबिअन नाईट्सच्या भाषांतराचा मानदेखील चिपळूणकरांना जातो. मूळ अरबी भाषेतल्या गोष्टी १७०७ पासूनच युरोपिय भाषेत भाषांतर होऊन वाचकांना मिळत असल्या तरीही १८८९ मध्ये आलेल्या रिचर्ड बर्टन याच्या इंग्रजी अनुवादाला अफाट लोकप्रियता मिळाली. पण त्याही आधी १८६१ सुमारास विष्णुशास्त्री यांचे वडील कृष्णशास्त्री यांनी हा अनुवाद मराठीत आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. विष्णुशास्त्री आणि हरी दामले यांच्या सहकार्याने ते १८९० सुमारास प्रकाशित झाले. आज उपलब्ध असलेली ६ भागांची सुधारित आवृत्ती १९५६ साली तयार केली गेली.
“Why Do Bees Buzz?” has been added to your cart. View cart