‘ऑशविट्झचा फोटोवाला’ ही नावानुसार ऑशविट्झमधल्या ज्यू छळछावणीमध्ये असलेल्या विल्हेम ब्रास या फॉटोग्राफर कैद्याचे अनुभवकथन करणारी कादंबरी आहे. ती सत्यघटनेवर आधारलेली आहेच पण अजून अनेक सत्य घटना आणि समकालीन पुष्टी देणाऱ्या संदर्भांची जोड आहे. लुक क्रिप्पा आणि मॉरिझिओ ओनिस लेखक संशोधक जोडीने इटालियन भाषेत लिहिलेल्या पुस्तकाचा हा अनुवाद आहे. विल्हेम ब्रास हा तरुण फोटोग्राफर पोलिश वंशाचा होता, 1940 मध्ये जर्मनीने पोलंड जिंकल्यावर त्याची अनेकदा चौकशी केली गेली होती पण त्याने हिटलरचा निष्ठावंत होण्यास नकार दिला. पुढे फ्रांस मध्ये जाऊन मुक्त सैन्यात प्रवेश करण्याच्या बेतात असताना पोलंड सीमेवर त्याला अटक झाली आणि त्याची रवानगी राजकीय कैदी म्हणून ऑशविट्झमध्ये झाली. 1940 ते 1945 याकाळात त्याने जवळपास 50 हजार छायाचित्र काढली, जर्मन सैन्याच्या नजरेतून ती वाचवली. पुढे सामान्य आयुष्य जगताना पुन्हा कधीही कॅमेरा हातात घेतला नाही. या छायाचित्रांबाबत तो बराच काळ गप्प राहिला. छावणी नष्ट झाल्याच्या 60 वर्षानंतर त्याने बीबीसीला एक दीर्घ मुलाखत दिली आणि या पुस्तकाचा मसुदा तयार व्हायला मदत झाली. या पुस्तकामुळे ज्यू छळछावणी, त्यांची अमानुष कार्यपद्धती आणि आपल्याला ज्ञात असलेल्या सत्यापेक्षा अधिक जास्त दाहक असलेलं सत्य समोर आलं. जगाच्या अनेक भाषात ही कादंबरी भाषांतरित झाली आणि मग मराठीमध्ये आली.
“Dr. Salim Ali | डॉ. सलीम अली” has been added to your cart. View cart
AUSCHWITZCHA PHOTOWALA | ऑशविट्झचा फोटोवाला
ऑशविट्झचा फोटोवाला
मूळ लेखक: लूका क्रिप्पा, मॉंरिझिओ ओनिस
अनुवाद: वर्षा वेलणकर
साहित्यप्रकार: चरित्र
प्रकाशक: मेहता पब्लिकेशन
बांधणी: पेपरबॅक
पृष्ठसंख्या: २८४
AUSCHWITZCHA PHOTOWALA
Writer: Luca Crippa, Maurizio Onnis
Translator: Varsha Velankar
Category: Biography
Publisher: Mehata Publication
Binding: Paperback
Pages: 284
₹480.00 Original price was: ₹480.00.₹430.00Current price is: ₹430.00.
Related products
-
Biography & Autobiography
Jagachya Pathivar | जगाच्या पाठीवर
₹350.00Original price was: ₹350.00.₹315.00Current price is: ₹315.00. Add to cart -
Biography & Autobiography
Upara | उपरा
₹220.00Original price was: ₹220.00.₹200.00Current price is: ₹200.00. Add to cart -
Biography & Autobiography
Mahanayak | महानायक
₹550.00Original price was: ₹550.00.₹495.00Current price is: ₹495.00. Add to cart -
Biography & Autobiography
Arpanpatrikatoon G.A. Darshan | अर्पणपत्रिकांतून जी. ए दर्शन
₹400.00Original price was: ₹400.00.₹360.00Current price is: ₹360.00. Add to cart -
Biography & Autobiography
Hasare Dukkha | हसरे दु:ख
₹500.00Original price was: ₹500.00.₹450.00Current price is: ₹450.00. Add to cart