साधू ते विक्षिप्त, छांदिष्ट, अलौकिक माणसं अशा ‘अवलिया’ शब्दाच्या नाना अर्थच्छटा आहेत. या मंडळीचं जग आणि जगणं सर्वसामान्यांच्या वकुबाबाहेरचं, तर्काबाहेरचं असतं. अर्थात, आपल्यातल्या या वेगळेपणाची सुप्त जाणीवही या अवलियांना असतेच. साहजिकच, वाट्याला येणारी चित्रविचित्र सुखदुःखं ती एका नशेत नि नादात पेलतात. अशा विस्कळीत-विसंगत आयुष्यातून ‘नियती’ नामक शिल्पकार एकाहून एक देखणी शिल्पं घडवत असतो. फ्रेंच जगतातली अशीच काही लोकविलक्षण माणसं या पुस्तकातून आपल्या भेटीला आली आहेत. यात आहे एक गणिका, जी पुढे फ्रान्सची महागायिका बनते; एक विदूषक, जो लोकांना हसवता हसवता, एक दिवस गरिबांसाठी अन्नछत्रे काढतो ; चर्चचा पाद्री, विस्थापितांना निवारा देणारी जगव्यापी चळवळ चालवतो तर गलिच्छ वस्तीत वाढलेला, वंशवादाचा बळी ठरलेला युवक फ्रान्सचा बलाढ्य फुटबॉल खेळाडू म्हणून नावारूपास येतो. सारंच भन्नाट, अकल्पनीय! प्रतिकूल परिस्थितीशी कडवी झुंझ देतानाही अम्लान ‘राहिलेली’ उमेद व त्यांनी केलेले समाजकार्य अचंबित करणारं आहे.
“Dr. Salim Ali | डॉ. सलीम अली” has been added to your cart. View cart
Avaliyanchi Mandiyali | अवलियांची मांदियाळी
Related products
-
Biography & Autobiography
Jagachya Pathivar | जगाच्या पाठीवर
₹350.00Original price was: ₹350.00.₹315.00Current price is: ₹315.00. Add to cart -
Biography & Autobiography
Ek Hota Carver | एक होता कार्व्हर
₹250.00Original price was: ₹250.00.₹225.00Current price is: ₹225.00. Add to cart -
Biography & Autobiography
Agnipankh | अग्निपंख
₹240.00Original price was: ₹240.00.₹220.00Current price is: ₹220.00. Add to cart -
Biography & Autobiography
Mahanayak | महानायक
₹550.00Original price was: ₹550.00.₹495.00Current price is: ₹495.00. Add to cart