मोनिका कान्टिएनीने या पुस्तकात पर्यावरणाचा होत असलेला विनाश, विस्थापन, स्थलांतर अशा प्रकारच्या अनेक विषयांना संवेदनशीलपणे हात घातला आहे. या गोष्टीसाठी तिने अतिशय कल्पकतेने मोजकीच पात्रं निवडली आहेत. ती आहेत बेन, साद्री आणि दोन देवमासे!
त्यांचे भवताल अद्भूत असेच आहेत. तिची पात्रं ज्या ज्या जगांचं प्रतिनिधीत्व करतात, त्या त्या जगांच्या भल्यासाठी ती काय करतात, काय घडवून आणतात, कोणते मार्ग शोधतात हे सारं फक्त युवा पिढीलाच नाही, तर सगळ्या प्रकारच्या वाचकांना नक्कीच रंजक वाटेल यात शंका नाही. ही कथा कशी समजून घ्यायची, तिचा अर्थ काय आणि कसा लावायचा हा सगळा प्रवास वाचकाने करून पाहावा असाच आहे.