चतुर ही युवा साहित्य अकादमी पुरस्कार, २०२१ प्राप्त लेखक प्रणव सखदेव यांची दुसरी कादंबरी. ही कादंबरी मेटाफिक्शन स्वरुपात आपल्यासमोर कथा सांगते. एका नवख्या लेखकाची इच्छा असते की, मरण्याआधी त्याने लिहिलेल्या गोष्टींचं पुस्तक व्हावं. पण तसं न होता तो मरतो. मग त्याची बायको त्याची इच्छा पूर्ण करायचे ठरवते. पुढे तिला त्याने लिहिलेल्या आणखी काही गोष्टी सापडतात आणि आता काय? तिला प्रश्न पडतो. आणि मूळ पुस्तकात या नव्या गोष्टी घालता घालता ती स्वत:देखील लिहू लागते! आणि कादंबरी समोर येते.