हा ग्रंथ म्हणजे मी माझी भूमिका विस्ताराने मांडण्याचा केलेला एक प्रयत्न. डॉ. भालचंद्र नेमाडे त्यासाठी निमित्तमात्र. ही भूमिका माझी आहे म्हणून तिला सर्वस्वी जबाबदार मीच…. आज मानवजातीसमोर अनेक आव्हाने आहेत. त्यांना परत मागे फिरून तोड देता येणार नाही. पुढेच जावे लागेल. हे शतक जागतिकीकरणाचेच असणार. त्यात संस्कृतीसह सर्वांचेच अभिसरण होणार त्यातून भांडवलशाही तिचे अत्युच्च टोक गाठणार की समाजवाद हे आज कोणालाही सांगता येणार नाही; परंतु एका नव्या दर्शनाच्या सर्जनाची आवश्यकता सर्वांनाच वाटत आहे. त्याचा पाया बौद्ध आणि मार्क्सवादी दर्शनात सापडू शकतो. बुद्धांनी ‘सम्यक आजीवनाचा’ मध्यम मार्ग प्रतिपादिला. कार्ल मार्क्स यांनी निसर्गाला माणसाचे निरीन्द्रिय शरीर मानून त्याला कोणतीही इजा न करता त्याच्यातील उत्पादक स्रोताद्वारे माणूस कृत्रिम गरजा टाळून मानवी गरजांची परिपूर्ती करू शकतो हे स्पष्ट केले. त्यामुळे या नव्या दर्शनात नियोजित। अर्थव्यवस्थेचा पुरस्कार असावा. उत्पादन प्रक्रियेत मानवी गरजांनाच सर्वोच्च स्थान असावे. त्याचे वितरण मानवकेंद्री असावे. हे दर्शनच उद्याच्या अखिल मानवजाती प्रबोधनाचा विषय ठरेल. त्यातून जे जनमत घडेल त्यातूनच भविष्याला दिशा मिळेल. त्यासाठी साहित्यिक, कलावंत, विचारवंत, शास्त्रज्ञ यांना महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागेल. यापूर्वी जगात झालेल्या प्रत्येक क्रांतीत ती त्यांनी पार पाडली होती. आजही ते पुढे येऊन या प्रबोधन चळवळीचे नेतृत्व करतील, अशी आशा आहे.
“Power Pen and Patronage: Media, Culture and the Marathi Society” has been added to your cart. View cart
Deshivad: Samaj Ani Sahitya | देशीवाद: समाज आणि साहित्य
देशीवाद: समाज आणि साहित्य
लेखक: रावसाहेब कसबे
साहित्यप्रकार:
प्रकाशक: Folklore House
बांधणी: पेपरबॅक
पृष्ठसंख्या: ४६२
Deshivad: Samaj Ani Sahitya
Writer: Ravsaheb Kasabe
Category:
Publisher: Folklore House
Binding: Paperback
Pages: 462
₹600.00 Original price was: ₹600.00.₹540.00Current price is: ₹540.00.
Related products
-
Collection of Articles
Streevad Ani 1975 Nantarchi Marathitil Aatmacharitre | स्त्रीवाद आणि १९७५ नंतरची मराठीतील आत्मचरित्रे
₹700.00Original price was: ₹700.00.₹630.00Current price is: ₹630.00. Add to cart -
Collection of Articles
Marathi Sahitya: Roop Ani Rang | मराठी साहित्य: रूप आणि रंग
₹320.00Original price was: ₹320.00.₹288.00Current price is: ₹288.00. Add to cart -
Collection of Articles
Iti-Aadi | इति-आदि
₹500.00Original price was: ₹500.00.₹450.00Current price is: ₹450.00. Add to cart -
Art
Kalantar | कालान्तर
₹200.00Original price was: ₹200.00.₹180.00Current price is: ₹180.00. Add to cart -
Criticism
Poorvaprabha Aani Pashchim Abha | पूर्वप्रभा आणि पश्चिम आभा
₹424.00Original price was: ₹424.00.₹382.00Current price is: ₹382.00. Add to cart