अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात वादळवारा सुटून पालापाचोळा उडून जावा तद्वत विद्युतवेगाने येऊन हिंदुस्थानात मराठ्यांनी पाय रोवले आणि मोंगल सत्ता खिळखिळी होऊन केवळ नामशेष बनली. शाहूछत्रपती महाराजांचा पेशवा बाजीराव या सगळ्यांचा पुढारी होता; निजामासारख्या शत्रूच्या शब्दात सांगायचं तर तो मराठ्यांचं ‘रब्बूलनी’ म्हणजे दैवत झाला होता. बाजीराव गेल्यावर जरा कुठे शत्रूंना हायसं वाटावं, पण ते त्यांच्या नशिबात नव्हतं. ज्येष्ठ बाजीरावपुत्राने आपल्या पित्याचा वारसा आणखी पुढे चालवत, मराठी सत्ता बंगालपासून पंजाबपर्यंत, आणि कर्नाटकपासून दिल्लीपर्यंत विस्तारली. जणू काही सवाई बाजीराव, अशाहमतपनाह म्हणून नावाजल्या गेलेल्या, शत्रूला “आम्ही गनीम लोक शिवाजी महाराजांचे शिष्य आहो” असं ठणकावून सांगणाऱ्या या पेशव्याचं नाव होतं बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब ! एकंदर दहा मोठ्या मोहिमा आणि वीस वर्षांची प्रचंड कारकीर्द, त्यातले महाप्रचंड मनसुबे कागदावर मांडायचे तर किमान दीड दोन हजार पानं खर्ची पडतील. त्यामुळेच, नानासाहेबांच्या आयुष्याच्या काही प्रमुख पैलूंवर, त्यांच्या निवडक मोहिमांवर, त्यांच्या चाणाक्ष व्यवस्थापनावर आणि मुत्सद्देगिरीवर प्रकाश टाकत जवळपास एकूण साडेचारशे पानांत, पाच भागात या कर्तबगार पेशव्याचं चरित्रं आणि चित्रं उभी करणारी ही कादंबरी – धुरंधर !
“Bhinteet Ek Khidakee Asaychi | भिंतीत एक खिडकी असायची” has been added to your cart. View cart
Dhurandhar: Peshwa Nanasaheb | धुरंधर: पेशवा नानासाहेब
धुरंधर: पेशवा नानासाहेब
लेखक: कौस्तुभ कस्तुरे
साहित्यप्रकार: कादंबरी
प्रकाशक: कौस्तुभ कस्तुरे बुक्स
बांधणी: हार्डबाउंड
पृष्ठसंख्या: ४४०
Dhurandhar: Peshwa Nanasaheb
Author: Kaustubh Kasture
Category: History Novel
Publisher: Kaustubh Kasture Books
Binding: Hardbound
Pages: 440
₹550.00 Original price was: ₹550.00.₹495.00Current price is: ₹495.00.
Related products
-
Novel
The Grapes of Wrath | द ग्रेप्स ऑफ रॉथ
₹700.00Original price was: ₹700.00.₹630.00Current price is: ₹630.00. Add to cart -
Novel
Mahamaya Nilavanti | महामाया निळावंती
₹350.00Original price was: ₹350.00.₹315.00Current price is: ₹315.00. Add to cart -
Novel
Target: Asad Shah | टार्गेट: असद शाह
₹450.00Original price was: ₹450.00.₹405.00Current price is: ₹405.00. Add to cart -
Novel
Satpatil Kulvrutant | सातपाटील कुलवृत्तांत
₹1,200.00Original price was: ₹1,200.00.₹1,080.00Current price is: ₹1,080.00. Add to cart -
Novel
Yatim | यतीम
₹260.00Original price was: ₹260.00.₹182.00Current price is: ₹182.00. Add to cart