Dhyanache Prakar | ध्यानाचे प्रकार

Sale!

ध्यानाचे प्रकार
मूळ लेखक: ओशो
अनुवाद: दिनकर बोरीकर
बांधणी: पेपरबॅक
पृष्ठसंख्या: 380

Original price was: ₹350.00.Current price is: ₹315.00.

Original price was: ₹350.00.Current price is: ₹315.00.

एकविसाव्या शतकातील जीवन प्रत्येक पावलागणिक, प्रत्येकासाठीच जास्तीत जास्त तणाव निर्माण करत आहे. गौतम बुद्धांच्या काळाप्रमाणे केवळ ध्यानात शांत बसणे हे या काळात तितके सोपे राहिले नाही. ध्यान : या पुस्तकात ओशोंनी तयार केलेल्या ध्यानाच्या वेगवेगळ्या पद्धती टप्प्याटप्प्याने शिकविल्या आहेत. यात ओशोंच्या प्रसिद्ध सक्रिय ध्यानाचा आणि ओशोंच्या मेडिटेटिव्ह थेरेपींचाही समावेश आहे. या पद्धती थेट आपल्या आयुष्यातील तणाव कमी करण्यास आणि आपल्याला जागरूक, उत्साहवर्धक व शक्तिवर्धक बनविण्यास मदत करतात. ओशो अनेक प्राचीन तसेच सुंदर तंत्राचेसुद्धा वर्णन करतात : विपश्यना आणि झाझेन ध्यानाने केंद्रीकरण, प्रकाशावरील आणि काळोखावरील ध्यान, हृदय खुलं करण्यावरील ध्यान इ. यासोबतच, यात ओशोंनी ध्यानासंबंधी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली आहेत, ज्यात ध्यान काय आहे, ते सुरू कसे करावे आणि स्वत:ला जाणून घेण्याचा आणि आपल्या सामर्थ्याची पूर्तता करण्याचा आंतरिक प्रवास कसा चालू ठेवावा, याबद्दल माहिती आहे. ध्यानाला सुरुवात आहे; पण शेवट नाही. ते चालूच राहते, अनंत आणि प्रदिर्घ काळासाठी. मन छोटे आहे. ध्यान तुम्हाला स्वत:च्या अस्तित्वाचे भान देते. ध्यान तुम्हाला वैश्विक शक्तींशी एकरूप होण्यास मुक्त करते. ‘‘ध्यानाला सुरुवात करा म्हणजे तुम्ही समृद्ध व्हाल- शांती, प्रसन्नता, सुख आणि संवेदनशीलता तुम्हाला प्राप्त होईल. ध्यानातून जे काही प्राप्त होईल ते आयुष्यात अवलंबिण्याचा प्रयत्न करा. ते विभागून घ्या, कारण जे काही विभागले जाते ते लवकर वाढते आणि जेव्हा तुम्ही मृत्यूच्या दारापर्यंत पोहोचता, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की, तेथे मृत्यूच नाही. तुम्ही त्याला निरोप देऊ शकता, तेथे अश्रूंची किंवा दु:खाची काहीच गरज नाही. कदाचित आनंद अश्रू असतील; पण दु:खाचे नक्कीच नाही.

Scroll to Top