मानवी सभ्यतेला आणि पृथ्वीतलावरच्या जीवसृष्टीला विषाणूंनी ज्या प्रकारें आकार दिला आहे, हे आता कुठे आपल्याला उमजू लागलं आहे. आपल्यापैकी प्रत्येकावर ज्या अदृश्य शक्ती परिणाम करत असतात, त्यांची भुरळ घालणारी झलक प्रणय लाल यांच्या पुस्तकामध्ये आपल्याला दिसते. चित्तवेधक आणि ज्ञानात भर टाकणारं!’
– सिद्धार्थ मुखर्जी, –
द एम्परर ऑफ ऑल मॅलडीज या पुस्तकाचे पुलित्झर पारितोषिक विजेते लेखक.
‘आपल्यापैकी बहुतेक जण विषाणूंकडे रोगकारक सूक्ष्मजीव म्हणून पाहतात, परंतु ते निसर्गातले सर्वाधिक वैविध्य असलेले, सर्वाधिक संख्येने आढळणारे सूक्ष्मजीव आहेत, जे सजीव आणि निर्जीवांच्या सीमारेषेवर वास करतात. वाचकाला खिळवून ठेवणाऱ्या, सुंदर रेखाचित्रांनी सजलेल्या या पुस्तकात प्रणय लाल आपल्याला विषाणूंच्या जगताची भव्य यात्रा घडवतात आणि त्यांचा इतिहास, आणि निसर्गात ते बजावत असलेल्या विभिन्न विस्मयकारी भूमिकेचं दर्शन घडवतात. तरुण वाचकांसह, ज्यांना ज्यांना निसर्गात रस आहे, त्या सर्वांना हे पुस्तक अतिशय आनंद देईल.’
– वेंकी रामकृष्णन,