वाचकहो! तुम्हाला माणूसचोर (man-stealer) आणि त्यांचे हेतू यांच्याबद्दल सहानुभूती वाटते की पायदळी तुडवल्या जाणाऱ्या या शोषितांबद्दल? जर तुम्ही पहिल्याबरोबर असाल तर तुम्ही माणूस आणि ईश्वराचे शत्रू आहात. जर तुम्ही दुसऱ्या वर्गासोबत असाल तर त्यांच्याकरिता तुमची काय करायची तयारी आहे? कोणतं साहस तुम्ही त्यांच्याकरिता करू शकता? प्रत्येक जोखड झुगारून देण्याकरिता कृपा करून प्रामाणिकपणानं प्रयत्नशील राहा आणि शोषितांना त्यांच्या बंधनातून मुक्त करा. असं करताना कितीही संकटं आली तरी त्यांची पर्वा करू नका. त्यासाठी कितीही मूल्य चुकवावं लागलं तरी ते कमीच समजा. तुम्ही फडकवणार असलेल्या ध्वजावर ‘गुलामगिरीशी कोणतीही तडजोड नाही, गुलाममालकांशी कोणतंही सहकार्य नाही.’ ही अक्षरं कोरून ठेवा.
- डब्ल्यू. एम. लॉईड गॅरिसन