भा. रा. भागवत यांच्या दुर्मीळ भय आणि रहस्यकथा पुन्हा एकदा रसिक वाचकांच्या भेटीला!
भा. रा. भागवत म्हणजे बालसाहित्य, उत्तम अनुवाद, विनोदी कथा आणि विज्ञान साहित्य यांच्याशी जोडलेले ‘बालमित्र’ साहित्यिक ! त्यांचे फास्टर फेणे आणि बिपीन बुकलवार तर कित्येक पिढ्या लहानांपासून थोरांच्या मनात कायमच घर करून बसले आहेत.
पण भा. रां.च्या मोठ्यांसाठी लिहिलेल्या भयकथा आणि रहस्यकथा याबद्दल कधी ऐकले आहे का? नाही ना?
दीर्घकाळ बालसाहित्याशी जोडल्या गेलेल्या भागवतांनी मोठ्यांसाठी लिहिलेल्या; विलक्षण रहस्य-उत्कंठा-थरार यांचे अफलातून मिश्रण असलेल्या; काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेल्या या भय/रहस्यकथा प्रदीर्घ कालावधीनंतर परत येत आहेत आपल्या मनाचा आणि काळजाचा ठाव घेण्यासाठी!
भा. रां.ची एक खास दुर्मीळ चीज-
भीती आणि रहस्य यांनी भारलेला… ‘घुमट’!
प्रकाशन दिनांक – ३१ मे २०२३ (भा. रा. भागवत यांचा ११३ वा जन्मदिवस)