विख्यात लेखक मरिओ पुझो यांच्या गॉडफादर या जगभर गाजलेल्या कादंबरीचा रविंद्र गुर्जर यांनी केलेला अनुवाद आहे. या कादंबरीवरून चित्रपटही निघाला होता.
डॉन व्हिटो कॉलिऑन याच्या मुलीच्या कोनीच्या विवाहसमारंभाने या कादंबरीची सुरुवात होते. व्हिटोचा धाकटा मुलगा मायकेल आपली मैत्रीण काय अॅडॅम्स हिची त्याच्याशी ओळख करून देतो.
जॉनी फॉन्टेन हा प्रसिद्ध गायक व्हिटोला चित्रपटात भूमिका मिळवून देण्यास मदत करण्याची विनंती करतो. जॉनीला भूमिका मिळवून देण्यासाठी व्हिटो टॉम हेगनला लॉस एन्जेल्स येथे पाठवतो.
पुढे काय होते, ते मूळ कादंबरीत वाचणेच योग्य. मात्र, थरार आणि उत्कंठा निर्माण करण्याची पुझोची हातोटी काही विलक्षणच आहे. त्यामुळे कादंबरी खिळवून ठेवते.