Govyatil Kille | गोव्यातील किल्ले

Sale!

Author: महेश तेंडुलकर
Category: पर्यटन
Publication: मर्वेन टेक्नॉलॉजीज
Pages: 384
Weight: 450 Gm
Binding: Paperback

Original price was: ₹525.00.Current price is: ₹475.00.

Original price was: ₹525.00.Current price is: ₹475.00.

गड-कोट-दुर्ग किल्ल्यांनी संपन्न असलेल्या महाराष्ट्र राज्यालगत गोवा राज्य आहे. गोवा राज्यात महाराष्ट्र राज्याच्या तुलनेत किल्ल्यांची संख्या जरी कमी असली तरी त्यांचे भौगोलिक स्थान, राजकीय महत्त्व आणि दुर्गस्थापत्य हे लक्षवेधी आहे. हे किल्ले निळ्याशार समुद्रालगत आहेत, तर काही भूशिरांवर बांधलेले आहेत आणि काही नद्यांच्या काठांवर बांधलेले आहेत. आज जे किल्ले सुस्थितीत आहेत ते सर्व पोर्तुगीज दुर्गस्थापत्यकलेची उत्तम उदाहरणे आहेत. कमी उंचीची तटबंदी, किंचित ढाळ दिलेले त्रिकोणी आकाराचे बुरूज, बुरुजाच्या टोकावर असलेले बार्तिझन आणि आतील तोफा हे सारे दुर्गवैभव आहे. त्यामुळे इतिहास संशोधक महेश तेंडुलकर यांनी लिहिलेले गोव्यातील किल्ले हे पुस्तक दुर्गप्रेमींच्या संग्रही असावे असेच आहे. पुस्तकाच्या शेवटी दिलेला मराठी इंग्रजी पोर्तुगीज शब्दकोश किल्ल्यांशी संबंधित आहे.

Scroll to Top