आपल्या भोवतालाशी पिढ्यान्पिढ्या जपलेल्या जैविक नात्याला जागतिकीकरणाच्या रेट्यात निव्वळ व्यावहारिक अवकळा आल्याचं वास्तव ही कादंबरी अधोरेखित करते. माणसं, जमीन, नद्या, डोंगर, पशू, पक्षी, प्राणी या सर्वांकडे उपयुक्ततावादी दृष्टिने बघण्याची भांडवलदारी वृत्ती ज्या गतीने हे सर्व आणि त्यासोबत कष्टपूर्वक जोपासलेली एक सबंध संस्कृती गिळंकृत करत चालली आहे ते माणसाला कमीपणा आणणारं असल्याची विदारक जाणीव या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे. प्रेम, औदार्य, स्वीकारार्हता, जिव्हाळा, समंजसपणा, सहनशीलता या मूल्यांच्या जागी आत्मकेंद्रितपणा, स्वार्थीपणा, खोटेपणा, आक्रस्ताळेपणा हेच न्यू नॉर्मल असल्याचं ठसवणारा जीवनव्यवहार शहरांसोबत गावखेड्यांनाही ग्रासून असल्याचं लेखकाचं निदान वास्तवदर्शी असल्याचं कादंबरीतील कित्येक घटनाप्रसंगातून समोर येत राहतं आणि निवेदक निंबालाल साखरे सोबत वाचकालाही अंतर्मुख करतं.
“BENEATH DIVIDED SKIES” has been added to your cart. View cart
ईन मीन तीन बिघे | In Min Tin Bighe
Related products
-
Fiction
The Legend of Bahirji Naik: Raiders of Surat (Book I) | लिजेंड ऑफ बहिर्जी नाईक: सुरतेवर छापा (भाग १)
₹450.00Original price was: ₹450.00.₹405.00Current price is: ₹405.00. Add to cart -
Fiction
Angulimal | अंगुलीमाल
₹250.00Original price was: ₹250.00.₹225.00Current price is: ₹225.00. Add to cart -
Fiction
Kshatriyakulawant Sadhu | क्षत्रियकुळावंत साधू
₹440.00Original price was: ₹440.00.₹396.00Current price is: ₹396.00. Add to cart -
Fiction
The Return of Sherlock Holmes | शेरलॉक होम्स परत येतो आहे
₹195.00Original price was: ₹195.00.₹175.00Current price is: ₹175.00. Add to cart -
Fiction
Nagrlyavin Bhui | नांगरल्याविण भुई
₹325.00Original price was: ₹325.00.₹292.00Current price is: ₹292.00. Add to cart