Kam Tamam @Wagha Border | काम तमाम @वाघा बॉर्डर

Sale!

काम तमाम @वाघा बॉर्डर
लेखक: सतीश तांबे
साहित्यप्रकार: कथासंग्रह
बांधणी: पेपरबॅक
पृष्ठसंख्या: १६४

Kam Tamam @Wagha Border
Author: Satish Tambe
Category: Collections of Stories
Binding: Paperback
Pages: 164

Original price was: ₹260.00.Current price is: ₹235.00.

Original price was: ₹260.00.Current price is: ₹235.00.

सतीश तांबे हे मराठीमधले नावाजलेले लेखक – कथाकार असून हा त्यांचा नवीन नवीन कथासंग्रह होय. यात एकूण चार दीर्घ कथा आहेत. या पुस्तकाला जेष्ठ पत्रकार कुमार केतकर यांची प्रस्तावना आहे.
या संग्रहातल्या कथा आपल्याला थेट भिडतात याचे कारणच मुळी त्या आपल्या परिचित परिसरातल्या आहेत. परंतु त्या परिचित वास्तवाला अनपेक्षित छेद देऊन आपल्याला काहीशा गूढ आणि काहीशा रहस्यमय अवास्तवाकडे घेऊन जातात. वाचताना धक्का बसतो, भीतीही वाटते आणि म्हणून उत्कंठाही वाढते. सतत कुठेतरी जाणवत राहते की या ‘अवास्तव वास्तवाला’ आणि त्यातील क्रौर्याला तसेच करुणेला आपल्या मनात खोल स्थान आहे… संशयाने आणि भीतीने, अनिश्चिततेने आणि अस्वस्थतेने आपले दैनंदिन जीवन कसे वेढलेले आहे हे या सर्व कथांमध्ये ठसठसत जाणवत राहते.
– कुमार केतकर, प्रस्तावनेमधून

0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop
    Scroll to Top