विविध साहित्यप्रकारांत लेखन करून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या लेखिका, कवयित्री म्हणून संजीवनी बोकील ओळखल्या जातात. एकाच वेळी प्रौढांसाठी आणि बालांसाठी सकस लेखन करून त्यांनी आपल्या लेखनाचा पैस सिद्ध केला आहे. ‘कवडशांचे फूल’ हा त्यांचा सात कथांचा अगदी नवा लक्षवेधी संग्रह. या कथासंग्रहाबद्दल ‘लक्षवेधी’ हा शब्द वापरताना तो तेवढाच सार्थ आहे याची जाणीव त्यातील कथा वाचून नक्कीच होते. माणसांच्या आणि विशेषतः स्त्रियांच्या संबंधातील या वेगवगळ्या कथा आहेत. या सगळ्या कथांच्या मुळांशी त्या त्या माणसांच्या, स्त्रियांच्या वर्तमान आणि भूतकाळातील घटनांच्या अनुषंगाने त्यांच्या वाट्याला आलेले दुःखभोग आणि वेदना अधिक तीव्रतेने अधोरेखित होतात. एखाद्या घटनेने जखमेवरची खपली निघते आणि अख्खी जखमच भळभळू लागते. ही दुःखाची जाणीव या कथांमधील व्यक्तींना होते, ती त्यांच्या आयुष्याच्या मध्यावर किंवा सगळं संपून गेल्यावर ! पुन्हा ते सगळं नव्याने पकडता येत नाही ही जाणीव जशी त्या व्यक्तींना असते, तशीच ती दुखरी भावना वाचकांच्या मनातही सतत सलत राहते. हेच लेखिका म्हणून संजीवनी बोकील यांचे यश म्हणता येईल. या लेखिकेविषयी आणखी आवर्जून सांगायचे म्हणजे त्यांची भाषाशैली. अतिशय समर्पक प्रतिमांनी या कथा रसरसून उभ्या राहतात. या प्रतिमा पाहून त्यांच्या शैलीचा आणि कल्पकतेचा हेवा करावा असे वाटते.
“Orpheus | ऑर्फीयस” has been added to your cart. View cart
Kavadashanche Phool | कवडशांचे फूल
Related products
-
Stories
Rudra | रुद्र
₹200.00Original price was: ₹200.00.₹180.00Current price is: ₹180.00. Add to cart -
Stories
Raktamudra | रक्तमुद्रा
₹425.00Original price was: ₹425.00.₹390.00Current price is: ₹390.00. Add to cart -
Stories
Astisutra | अस्तिसूत्र
₹300.00Original price was: ₹300.00.₹270.00Current price is: ₹270.00. Add to cart -
Stories
Gandhivadacha Chemical Locha Ani Itar Katha | गांधीवादाचा केमिकल लोचा आणि इतर कथा
₹295.00Original price was: ₹295.00.₹260.00Current price is: ₹260.00. Add to cart -
Compilations
Zambal: Ghandat Mansach Bhavvishwa Ulghadnarya Katha | झांबळ: घनदाट माणसांचं भावविश्व उलघडणाऱ्या कथा
₹280.00Original price was: ₹280.00.₹252.00Current price is: ₹252.00. Add to cart -
Stories
Vishwamitra Syndrome | विश्वामित्र सिण्ड्रोम
₹350.00Original price was: ₹350.00.₹315.00Current price is: ₹315.00. Add to cart