Manus ‘Asa’ ka vagato? | माणूस ‘असा’ का वागतो?

Sale!

माणूस ‘असा’ का वागतो?
लेखिका: अंजली चिपलकट्टी
बांधणी: Paperback
पृष्ठसंख्या: 431
MRP: ₹600

Original price was: ₹600.00.Current price is: ₹540.00.

Original price was: ₹600.00.Current price is: ₹540.00.

नैतिकता अन् सामाजिक विषमता, धर्मभावना आणि आध्यात्मिकता, प्रेम अन् लैंगिकता, आक्रमकता अन् भय, अनुपालन, धर्म-जात भेदाभेद, कल्पनाविश्व अन् साहित्य-कला-क्रीडा… माणसाच्या वर्तनाचे असे अनेकविध पैलू. उत्क्रांतिशास्त्र, मानववंशशास्त्र, भाषाशास्त्र, जेनेटिक्स, मेंदूविज्ञान, मानसविज्ञान, प्राणीवर्तनविज्ञान अशा विविध ज्ञानशाखांच्या मिलाफातून माणसाच्या वर्तनाचा अभ्यास चालू आहे. स्वत:चे सांस्कृतिक पर्यावरण घडवण्याची क्षमता असलेला एकमेव प्राणी म्हणजे माणूस. सहकार्य, परोपकार, साहचर्य हे गुण माणसाच्या उत्क्रांतीत महत्त्वाचे ठरले आहेत. माणसांना एकमेकांशी बांधणारी तत्वं माणसाच्या वर्तनात उत्क्रांतीनेच पेरली आहेत का? मानवी वर्तनाला विधायक वळण देण्याची अंगभूत क्षमता माणसातच आहे का ? अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा मागोवा घेणारे – आजच्या सामाजिक-राजकीय-आर्थिक परिस्थितीशी नानाविध ज्ञानशाखांच्या एकात्मिक अभ्यासाचा संबंध जोडत माणसाच्या व्यक्तिगत अन् सामूहिक वर्तनाचा वैज्ञानिक वेध घेणारे पुस्तक – माणूस असा का वागतो?

0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop
    Scroll to Top