Mind Sweat and Glory | माइंड स्वेट अँड ग्लोरी

Sale!

Mind Sweat and Glory
Author: Ashish Kasodekar
Publisher: Amaltash Books
Binding: Paperback
Pages: 156

Original price was: ₹400.00.Current price is: ₹360.00.

Original price was: ₹400.00.Current price is: ₹360.00.

आशिष कासोदेकर या महाराष्ट्रातील धाववेड्याने भारताच्या अतिउंचीवरील लडाख या ठिकाणी ५५५ किलोमीटर्सची “लेह ला अल्ट्रा मॅरेथॉन” धावण्याचे आव्हान फक्त १२६ तासांत लीलया पूर्ण केले. आशिष हा पराक्रम करणारा पहिला आणि एकमेव भारतीय असून जगातला केवळ तिसरा माणूस आहे. अनेक मॅरेथॉन स्पर्धांमध्ये त्याने भाग घेतला. प्रसिद्ध अशा कॉम्रेड्स, खार्दुंग ला या स्पर्धांमध्येदेखील त्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धांनंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. त्यानंतर त्यांच्या स्पर्धांची काठिण्य पातळी वाढतच गेली. १११ किलोमीटर्सचे अंतर त्यांनी १९ तास ४० मिनीटांत धावून पूर्ण केले. त्याही पुढे जात त्यांनी “लेह ला अल्ट्रा मॅरेथॉन” ३३३ किलोमीटर्स धावण्याचा धाडसी निर्णय घेतला. या स्पर्धेचा फायनल कट ऑफ ७२ तासांचा होता आणि तो संपायला केवळ ३१ सेकंद असताना त्यांनी ही शर्यत पूर्ण केली. या मॅरेथॉननंतर त्यांना ५५५ किलोमीटर्स मॅरेथॉनमध्ये धावण्याचे वेध लागले. अतिशय खडतर आव्हानांचा सामना करत त्यांनी ही मॅरेथॉन अतिशय सहजरीत्या पूर्ण केली. क्रीडाप्रेमी असलेल्या आशिषला अनेक साहसे करायची आवड आहे. त्याच्या धावण्याच्या अचाट कामगिरीची “गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स”नेही नोंद घेतली. साहसी क्रीडा प्रकारांपासून ते ऐतिहासिक क्रीडा प्रकारांपर्यंतचा त्याचा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. “माइंड स्वेट अँड ग्लोरी” हे पुस्तक म्हणजे आशिषचा प्रेरणादायी प्रवास आहे. यामध्ये नुसता धावण्याचा प्रवास नसून तो त्याहीपेक्षा व्यापक आहे. हा प्रवास तुम्हा-आम्हाला सर्वांनाच प्रेरित करणारा आहे.

1
    1
    Your Cart
    Agnipankh | अग्निपंख
    1 X 220.00 = 220.00
    Scroll to Top