गेली दोन दशक, गुंतवणुकीचा पसंतीचा पर्याय म्हणून म्युच्युअल फंड्स भारतीयांसाठी उदयास आले आहेत. ते रोकडसुलभता देतात. त्यात प्रवेश करणं आणि बाहेर पडण त्यातून मिळणाऱ्या परताव्यासहित सहजसाध्य असतं. त्यामुळे सोनं, स्थावर मालमत्ता किंवा मुदत ठेवींसारख्या पारंपरिक गुंतवणुकीपेक्षा, म्युच्युअल फंड्स हा एक नैसर्गिक निवडीचा पर्याय झाला आहे.
परंतु म्युच्युअल फंडाची लोकप्रियता वाढलेली असली, तरी आपल्या फायद्याप्रमाणे त्यांचा वापर करण्याची क्षमता वाढलेली नाही. म्युच्युअल फंडांचे पर्याय हजारो असल्यामुळे गुंतवणूकदाराची मति कुठित होऊन जाते.
बेस्टसेलिंग लेखिका आणि भारतात आर्थिक विषयांवर लिहिणाऱ्या मोनिका हालन या पुस्तकाद्वारा पुन्हा पदार्पण करत आहेत. या वेळी त्या म्युच्युअल फंडाविषयी आपल्याशी संवाद साधत आहेत.
साध्या-सोप्या भाषेत त्या म्युचुअल फंडाबद्दल असलेल्या शंका दूर करतात आणि दाखवून देतात की, त्या शंकांच परिमार्जन कस करायचं, रोख रकमेच्या प्रवाहाच व्यवस्थापन कसं करायचं आणि मुलांच्या शिक्षणाचं नियोजन कस करायच, इथपासून स्वतःचं घर कसं घ्यायचं आणि निवृत्तीनतरचं आयुष्य सुखकर होईल असं नियोजन कसं करायचं इथपर्यंत सगळं काही या पुस्तकात चर्चिल गेलं आहे. तुमची आर्थिक उद्दिष्ट गाठण्याच्या मार्गावर म्युच्युअल
फंडविषयी बोलू काही तुम्हाला आणून सोडतं. टिप्स नाहीत, युक्त्या प्रयुक्त्या नाहीत, फक्त एक शहाणपणाची पद्धत, जिच्यामुळे म्युच्युअल फंड्स तुमच्यासाठी चांगली कामगिरी करतील.