‘नॉर्थ अमेरिकन इंडियन्सच्या अस्वललोककथा’ हे एक विलक्षण पुस्तक आहे. लेखक संकलक डॉ अरुण प्रभुणे आपल्या मुलांकडे अमेरिकेत जातात काय, तिथे अस्वल प्राण्याविषयी कुतूहल निर्माण होतं काय आणि त्यातून हा सटिप छोटेखानी प्रकल्पग्रंथ मराठीमध्ये येतो काय, ही कथा देखील या पुस्तकात संग्रही केलेल्या लोककथांइतकीच रोचक आहे. अस्वल हा प्राणी जवळपास सगळ्याच प्राचीन जमातीमध्ये मौखिक गोष्टींच्या केंद्रस्थानी राहिला आहे. उत्तर अमेरिकन इंडियन्स त्याला अपवाद नाहीत. पण त्यांच्या कथांमध्ये सापडणारी विपुलता आणि संदर्भ अर्थातच वेगळे आणि जास्त गहन आहेत. या पुस्तकात अर्थातच सगळ्या इंडियन जमातींच्या सगळ्या लोककथा समाविष्ट नाहीत, पण जवळपास सगळ्या महत्वाच्या कथा यात आहेत. मराठी वाचक अमेरिकन मूळनिवासी लोकं अर्थात इंडियन्स आणि त्यांच्या लोककथा यांच्याशी फारशा परिचित नाहीत. अस्वलकथांचा विचार करता दुर्गा भागवत यांचं ‘अस्वल’ हे पुस्तक वगळता इतर पुस्तक उपलब्ध नाही. परिणामी लेखक कथा समोर ठेवण्याआधी उत्तर अमेरिकन इंडियन्स, त्यांची सामाजिक, प्राचीन तसेच सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि त्यात असलेलं अस्वलांचं स्थान हे सगळं आधी स्पष्ट करतात जे या पुस्तकाला विशेष बनवतं. एखादा विषय घेऊन त्यावर उत्तम संशोधन आणि संकलन करून पुस्तक प्रकाशित करणं हे तसं दुर्मिळ काम आहे, या चाळणीचा विचार करता ‘नॉर्थ अमेरिकन इंडियन्सच्या अस्वललोककथा’ वाचकाला अजिबात निराश करत नाही हे नक्की!
North American Indianschya Aswallokkatha | नॉर्थ अमेरिकन इंडियन्सच्या अस्वललोककथा
नॉर्थ अमेरिकन इंडियन्सच्या अस्वललोककथा
लेखक: डॉ. अरुण प्रभुणे
साहित्यप्रकार:
प्रकाशक: पद्मगंधा प्रकाशन
बांधणी: पेपरबॅक
पृष्ठसंख्या: २५५
North American Indianschya Aswallokkatha
Writer: Dr. Arun Prabhune
Category:
Publisher: Padmagandha Prakashan
Binding: Paperback
Pages: 255
₹300.00 Original price was: ₹300.00.₹270.00Current price is: ₹270.00.
Related products
-
Collection of Articles
21 Lessons for the 21st Century | २१ व्या शतकासाठी २१ धडे
₹500.00Original price was: ₹500.00.₹450.00Current price is: ₹450.00. Add to cart -
History
Gajapurcha Ransangram | गजापूरचा रणसंग्राम
₹200.00Original price was: ₹200.00.₹180.00Current price is: ₹180.00. Add to cart -
Essays
Marathyanchi Bakhar | मराठ्यांची बखर
₹450.00Original price was: ₹450.00.₹405.00Current price is: ₹405.00. Add to cart -
Compilations
Athavanitali Shikar | आठवणीतली शिकार
₹350.00Original price was: ₹350.00.₹315.00Current price is: ₹315.00. Add to cart -
History
Yuddhakhor America | युद्धखोर अमेरिका
₹425.00Original price was: ₹425.00.₹285.00Current price is: ₹285.00. Add to cart