डॉ.शिरीष चिंधडे या इंग्रजी वाड़्मयाचे अध्यापन केलेल्या व्यासंगी अध्यापक, लेखक, विचक्षण वाचकाने आपला उदरनिर्वाहाचा व्यवसाय
करतानाच विविध पुस्तकांमधून केलेली मुशाफिरी, ती करत असताना केलेल्या नोंदी, भाष्ये असा सगळा ऐवज या पुस्तकात एकत्रितरित्या उपलब्ध झालेला आहे. अर्थातच केवळ ‘पुस्तक परिचय’ असे सरधोपट रूप ह्या ग्रंथाचे नाही.
मराठी वाचकांस ज्ञात अज्ञात असलेले ग्युंटर ग्रास,आय.एफ.स्टोन,खुशवंतसिंग,आर.के.नारायण,मार्क शँड,डॉम मोरेस,झानिस झानेटाकिस ते मार्क टुली असे कितीतरी कवी, लेखक, तत्त्वज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, भटके – प्रवासी इथे भेटतील.