Purandare: Athravya Shatkatil Ek Kartbgar Gharane | पुरंदरे: अठराव्या शतकातील एक कर्तबगार घराणे

Sale!

पुरंदरे: अठराव्या शतकातील एक कर्तबगार घराणे
लेखक: कौस्तुभ कस्तुरे 
साहित्यप्रकार: इतिहास, चरित्र
प्रकाशक: राफ्टर पब्लिकेशन 
बांधणी: हार्डबाऊंड
पृष्ठसंख्या: २०८

Purandare: Athravya Shatkatil Ek Kartbgar Gharane
Writer: Kaustubh Kasture
Category: History, Biography
Publisher: Rafter Publications
Binding: Hardbound
Pages: 208

Original price was: ₹290.00.Current price is: ₹261.00.

Availability: 3 in stock

Original price was: ₹290.00.Current price is: ₹261.00.

Availability: 3 in stock

 सतराव्या शतकाच्या अखेरीस महाराष्ट्राच्या क्षितिजावर एक नवे घराणे उदयाला येऊ लागले होते. सासवडचे पुरंदरे ! राजाराम महाराजांच्या काळापासून स्वराज्याच्या सेवेत रुजू झालेल्या या घराण्याने अगदी पेशवाईच्या अखेरच्या क्षणापर्यंत स्वराज्याची मनोभावे सेवा केली. कोकणातून वरघाटी आलेल्या बाळाजी विश्वनाथांना प्रथम आसरा मिळाला तो पुरंदर्‍यांच्याच वाड्यात. प्राप्त होत असलेला पेशवाईचा मान मोठ्या मनाने श्रीवर्धनच्या भटांना दिला पुढे पेशव्यांनीही याचे उपकार म्हणून पुरंदर्‍यांना सातारा दरबारात मुतालकी आणि सरदारी दिली. अशा या ऐतिहासिक घराण्यातील कर्तबगार पुरुषांची ही कामगिरी. कौस्तुभ कस्तुरे लिखित “पुरंदरे – अठराव्या शतकातील एक कर्तबगार घराणे”. ह्या पुस्तकात अठराव्या शतकात पुरंदरे घराण्याला छत्रपती शाहू महाराजांपासून ते सवाई माधवराव पेशव्यांकडून आलेली अस्सल मोडी इनामपत्रे तसेच त्र्यंबक सदाशिव तथा नाना पुरंदर्‍यांना आलेली काही महत्वाची पत्रे प्रकाशित करण्यात येत आहेत. सदर मूळ मोडी कागदपत्रांची छायाचित्रेही पुस्तकात समाविष्ट करण्यात आली असून ही सर्व कागदपत्रे आजवर अप्रकाशित होती, ती प्रथमच प्रसिद्ध :होत आहेत.

0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop
    Scroll to Top