Saat Yugoslav Laghukatha | सात युगोस्लाव लघुकथा

सात युगोस्लाव लघुकथा
अनुवाद: गौरी देशपांडे 
साहित्यप्रकार: संकलित कथा, अनुवाद
प्रकाशक: साहित्य अकादेमी
बांधणी: पेपरबॅक
पृष्ठसंख्या: 54

Sat Yugoslav Laghukatha
Translation: Gauri Deshpande
Category: Compilation of Stories, Translation
Publisher: Sahitya Akademi
Binding: Paperback
Pages:54

80.00

80.00

इंग्रजीसह पश्चिम युरोपीय भाषांतील व रशियनमधील साहित्याचं भाषांतर भारतीय भाषांमधून बऱ्यापैकी झालेलं आपण बघू शकतो, पण भौगोलिक, सांस्कृतिक व राजनैतिक दृष्ट्याही आपल्या अधिक जवळ असणाऱ्या पूर्व युरोपीय देशातील इंग्रजीसह पश्चिम युरोपीय भाषांतील व रशियनमधील साहित्याचं भाषांतर भारतीय भाषांमधून बऱ्यापैकी झालेलं आपण बघू शकतो, पण भौगोलिक, सांस्कृतिक व राजनैतिक दृष्ट्याही आपल्या अधिक जवळ असणाऱ्या पूर्व युरोपीय देशातील साहित्याची आपल्याकडे उपेक्षाच आहे. या परिस्थितीत थोडी सुधारणा करणाऱ्या प्रयत्नांपैकी एक अत्यल्प प्रयत्न म्हणजे हे पुस्तक होय. या पुस्तकात युगोस्लावियाच्या 4-5 प्रमुख भाषांपैकी बहुतेकातील प्रतिनिधी कथा आहेत. तिथल्या इव्हो आंद्रीय यांचे नाव नोबेल पारितोषिक विजेते म्हणून बहुतेक वाचकांच्या कानावरून गेलेले असेलच. चीदोमीर शिवाय इव्हान त्सांकार व मिन्यारोकिच हेही आंतरराष्ट्रीय कीर्तीचे लेखक आहेत. त्सांकार यांचे सर्व लेखन स्लोव्हिनियन भाषेत झालेले असल्याने खुद्द युगोस्लावियातही सर्वसाधारण माणसाला त्यांच्या साहित्याचे सर्बो-क्रोॲशियनमधले भाषांतरच वाचायला मिळते. कित्येक ठिकाणी या कथातून वर्णिलेली परिस्थिती, पात्रे व चित्रे आता युगोस्लावियात सापडणार नाहीत. परंतु या सात कथा म्हणजे एका अपरिचित साहित्याची फक्त तोंड ओळख आहे. या पुस्तकांमुळे पूर्व युरोपीय भाषेतल्या साहित्याकडे आपली नजर जाते हे नक्की!

Scroll to Top