‘मुळात खरं तर माझी इथ येण्याची इच्छाच नव्हती. इथंच काय, या क्षणापर्यंत मी अशा कोणत्याच ठिकाणी कधी गेलो नव्हतो. वाफगावकरनं इतकी मनधरणी केली केली… त्याचं मन मोडायचं नाही, म्हणून केवळ मी आलो होतो’ या वाक्यानं कादंबरीची सुरुवात होते आणि उत्सुकता चालवण्याचीही! सुहास शिरवळकर यांची ही आणखी एक कादंबरी एका वेगळ्या जगात नेऊन सोडते.
पुढे काय होणार, उद्या काय होणार, परवा काय होणार, शेवटी काय होणार अशी उत्कंठा लागते; पण शेवट मात्र अधांतरीच असतो. कारण या कादंबरीतील पात्रे समांतर आयुष्य जगत असतात. समांतर आयुष्य नशिबात आलेला कोणीतरी भेटल्याशिवाय अधिच्याला मुक्ती मिळत नाही.
हे नेमकं काय आहे, हे वाचायला हवे…..
पुढे या पुस्तकावर मराठी मध्ये दोन सीजनची वेबसिरीज देखील आलेली आहे.