Sattar Diwas | सत्तर दिवस

Sale!

Author: पिअर्स पॉल रीड
Translators: रवींद्र गुर्जर
Category: कादंबरी, अनुवादित
Publication: श्रीराम बुक एजन्सी
Pages: 200
Binding: Paperback

Original price was: ₹200.00.Current price is: ₹180.00.

Original price was: ₹200.00.Current price is: ₹180.00.

१२ ऑक्टोबर, १९७२. युरुग्वे एअर फोर्सच्या ‘फेअर चाइल्ड एफ् २२७’ ह्या विमानानं पंचेचाळीस प्रवाशांसह आकाशात झेप घेतली. रग्बी खेळाडूंचा हौशी संघ चिलीकडे निघाला होता. अँडीज पर्वत ओलांडून त्यांना यायचं होतं. अँडीज हा हिमालयाच्या बरोबरीचा पर्वत समूह. त्याची लांबी जगामध्ये सर्वांत जास्त. त्यावरून ‘फेअर चाइल्ड’ विमान जाऊ लागलं आणि अचानक ते ढगात शिरलं. हिमवर्षाव चालूच होता. झंझावाती वाऱ्यानं विमानाला दोन प्रचंड तडाखे दिले. दुपारी ३-३० वाजता वैमानिकानं सँटियागो विमानतळावर ‘सब ठीक’चा संदेश दिला. परंतु त्यानंतर एकाच मिनिटाने सँटियागो टॉवरचा विमानाशी संपर्क तुटला. पुढचे आठ दिवस चिली, अर्जेटिना आणि युरुग्वेच्या लोकांनी विमानाचा जारीने शोध घेण्याचा प्रयत्न केला; पण व्यर्थ. अँडीजची शेकडो मैल लांबी, वादळ आणि हिमवृष्टी लक्षात घेता, विमान सापडण्याची शक्यता जवळजवळ नाहिशी झाली. उतारूंपैकी कोणीही वाचण्याचा संभव तर अजिबात नव्हता. दहा आठवड्यानंतर एक चिली शेतकरी आपल्या गुरांना चारण्यासाठी अँडीजच्या खोल दरीत गेला असताना त्याला दूरवर दोन माणसांच्या आकृत्या दिसल्या. त्यांचं स्वरूप भयानक होतं आणि ते गुडघ्यांवर खुरडत होते. शेतकऱ्याला जवळ येण्यासाठी जोरजोराने खुणावत होते. भीतीमुळे त्यानं दुरूनच रुमालातून कागद-पेन त्यांचेकडे फेकलं. दाढी वाढलेल्या, भकास चेहेऱ्याचा आणि कपड्यांच्या चिंध्या झालेल्या त्या इमानं काही तरी लिहून कागद परत फेकला. त्यावर लिहिलं होतं : ‘पर्वतावर कोसळलेल्या विमानातील मी एक उतारू आहे. मी युरुग्वेचा रहिवासी ….’

त्या दुर्दैवी अपघातातून पंचेचाळीस जणापैकी बचावलेल्या सोळा लोकांनी सांगितलेली त्यांच्या सत्तर दिवसांची हृदयद्रावक सत्यकथा!

Scroll to Top