लाकडी नक्षीकामानं सजलेल्या, पण आता जीर्ण झालेल्या ऐसपैस दरवाजात, त्या वाड्याच्या उंब-यात पाऊल घोटाळतंय. इथल्या घरधनिणीनं सालंकृत पावलांनी इथेच माप ओलांडलं असेल का? अंगणानं ओंजळीत रांगोळीची नक्षी घेऊन वाट पाहिली असेल का त्या मंगल क्षणाची…? आता तो सगळा दिमाख ओसरलाय… कोनाड्यातलं देवघर… आत डोकावलं तर मिणमिणत्या उजेडात आश्वस्त करणारी पितळी मूर्त कुणाची? अंधा-या जिन्यातून जाताना वाटलं, कितीतरी पैंजण आपल्या स्वारींची वाट पाहत अगतिक थांबले असतील का? मोठ्ठा चौक. त्यात एक तोंडापर्यंत पुरलेला रांजण. त्यातल्या अंधाराच्या पोटात हरवलेत का या वाड्यातले चैतन्यस्वर? का? काय घडलं असं? मनाला साखळदंडासारखे लोंबकळत असलेले अनुत्तरित प्रश्न. त्यांचं ओझं घेऊन मला निघावं लागतंय. कधी होईल का या रहस्यांचा उलगडा? माझ्या प्रश्नांची कालकुपीत दडलेली उत्तरं, इतिहासपुरुषा, तुला माहीत असतील का रे?
Sawashna | सवाष्ण
सवाष्ण
लेखक: क्षमा गोवर्धने-शेलार
साहित्यप्रकार: कादंबरी
प्रकाशक: राजहंस प्रकाशन
बांधणी: पेपर
पृष्ठसंख्या: २५५
Sawashna
Writer: Dr. Kshma Govardhane-Shelar
Category: Novel
Publisher: Rajhans Prakashan
Binding: Paperback
Pages:
₹380.00 Original price was: ₹380.00.₹342.00Current price is: ₹342.00.
Related products
-
Novel
Target: Asad Shah | टार्गेट: असद शाह
₹450.00Original price was: ₹450.00.₹405.00Current price is: ₹405.00. Add to cart -
Novel
Vishwasta | विश्वस्त
₹575.00Original price was: ₹575.00.₹517.00Current price is: ₹517.00. Add to cart -
Novel
Shreeman Yogi | श्रीमान योगी
₹750.00Original price was: ₹750.00.₹675.00Current price is: ₹675.00. Add to cart -
Novel
Papillon | पॅपिलॉन
₹450.00Original price was: ₹450.00.₹405.00Current price is: ₹405.00. Add to cart