१९७५ साली जेव्हा ‘गॉडफादर-२’ला ‘बेस्ट अॅडॉप्टेड स्क्रीन प्ले’चं अॅवार्ड मिळालं, तेव्हा मारिओ पुझोंनी त्यांच्या आभाराच्या चार शब्दांतले दोन शब्द त्यांच्या ‘गॉडफादर्स’साठी वापरले. ते म्हणाले, “माझ्या तिन्ही गॉडफादर्सचे आभार, ज्यांनी माझं पुस्तक पडद्यावर आणण्यासाठी मदत केली. ते पुस्तक मी जसा विचार केला, तसं त्यांनी पडद्यावर आणलं! त्यासाठी त्यांचे आभार.” ही क्लिप पाहताना “फ्रेंडशिप इज एव्हरीथिंग. फ्रेंडशिप इज मोअर दॅन टॅलेंट. इट इज मोअर दॅन गव्हर्मेंट. इट इज ऑलमोस्ट द इक्वल ऑफ फॅमिली.” या वाक्याची आठवण झाली. हे अर्थातच मारिओ पुझोंचं वाक्य.
मारिओ पुझो असं म्हणतात की, “तरुण असताना मी लिहीन ते लोकांनी वाचलं पाहिजे असं म्हणणारा लेखक जसजसा प्रगल्भ होत जातो, तेव्हा त्याला खऱ्या रसिक वाचकांची ओळख पटायला लागते. वाचकाला काय आवडतंय, त्याला काय हवंय, हे त्याला कळायला लागतं आणि मग त्याच्यासाठी लिखाणाची सुरुवात होते.’’
४९व्या वर्षी म्हणजे १९६९ मध्ये त्यांचं सगळ्यात प्रसिद्ध काम ‘The Godfather’ प्रकाशित झालं. ‘गॉडफादर’ या पुस्तकानं इतिहास घडवला, त्याने मारिओ पुझोंचं आयुष्य बदलून टाकलं. ते ‘द न्यू यॉर्क टाइम्स’च्या ‘बेस्ट सेलर’च्या यादीमध्ये सलग ६७ आठवडे होतं आणि त्या पुस्तकाच्या ९० लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्या. सिसिलीमधल्या गावापासून सुरू झालेला ‘गॉडफादर’चा प्रवास ला वेगास आणि हॉलिवुडसकट संपूर्ण अमेरिका व्यापून टाकणारा होता. रसिकांनी त्याला डोक्यावर घेतलं.
- मिलिंद दामले
या मारिओ पुझोंच्या 06 निवडक पुस्तकांचा संच वाचकांसाठी आता उपलब्ध