आयन रँडच्या अस्सल साहित्यिक दृष्टिकोनातून आणि परंपरेला छेद देणार्या त्यांच्या व्यक्तिवादी तत्त्वज्ञानातून साकारलेली ‘द फाउंटनहेड’ ही कादंबरी १९४३ साली प्रकाशित झाली तेव्हाच सार्या जगभरात तिची भरपूर प्रशंसा झाली.
या अजरामर कलाकृतीची कथा आहे- एका तत्त्वनिष्ठ तरुण आर्किटेक्टची. समाजात रूढ असलेल्या प्रमाणांविरुद्धच्या त्याच्या कठोरसंघर्षाची, आणि त्याच्याच प्रेमात असून त्याला रोखण्यासाठी आणि वाचवण्यासाठीही झगडणार्या एका सुंदर स्त्रीवरच्या त्याच्या उत्फुल्ल प्रेमाची.