जेष्ठ लेखक अनुवादक अंबरीष मिश्र ‘वाचन प्रसंग’च्या ब्लर्बमध्ये लिहितात, ‘आपण सगळे पुस्तक वाचतो. मित्रवर्य नीतिन वैद्य पुस्तकं जगतात. वैद्य पुस्तकं अंथरतात, पांघरतात; पुस्तकांना न्हाऊ-माखू घालतात, अंगडं-टोपडं चढवतात. ते पुस्तकांशी बोलतात, पुस्तकांचं ऐकतात-ऐकवतात. थोडक्यात माहिती देऊन वैद्यांचं भागत नाही; पुस्तकाच्या निरनिराळ्या असोसिएशन्सविषयी ते सहज लिहून जातात. चिमूटभर मागचं पुढचं सांगतात. ठिपके ठिपके जोडतात आणि वाचनातलं सृजन वेचतात.’ ‘वाचन प्रसंग’ वाचताना याचा पदोपदी अंदाज येतो. नीतिन वैद्य जाणते वाचक म्हणून वाचणाऱ्यांच्या जगात प्रसिद्ध आहेत. हे पुस्तक म्हणजे गेल्या काही काळात त्यांनी केलेल्या आणि अनुभवलेल्या वाचनाविषयीच्या वेगवेगळ्या बाजूंनी छोट्या-मोठ्या तपशिलात कधी नोंदी, कधी मत, कधी निरीक्षण तर कधी ललित पद्धतीनं लिहिलेल्या 100 स्फुटांचं संकलन आहे. यातल्या नोंदी या फक्त पुस्तकाविषयी मर्यादित नाहीत, त्या लेखक ते नियतकालिक, प्रकाशन संस्था ते खासगी अनुभव अशा व्यापक प्रतलावरच्या आहेत. या नोंदी वाचताना आपल्या अनेक नवीन पुस्तकं, लेखक तर कळतातच पण त्यापुढे जाऊन पूर्वश्रुत पुस्तकं, लेखक आणि त्यांच्या लिखाणाबाबत वैद्यांच्या नजरेतून, निरीक्षणातून आपल्याला एक वेगळी खिडकीदेखील सापडते. मराठी भाषेत ‘Book on Books’ अर्थात ‘पुस्तकांवरचं पुस्तक’ या प्रकारात मोडणारं हे सगळ्यात अलिकडचं पुस्तक!
“21 Lessons for the 21st Century | २१ व्या शतकासाठी २१ धडे” has been added to your cart. View cart
Vachan Prasang | वाचन प्रसंग
वाचन प्रसंग
लेखक: नीतिन वैद्य
साहित्यप्रकार: पुस्तकांवरील पुस्तके
प्रकाशक: मधुश्री पब्लिकेशन
बांधणी: पेपरबॅक
पृष्ठसंख्या: २१६
Vachan Prasang
Writer: Nitin Vaidya
Category: Books on books
Publisher: Madhushree Publication
Binding: Paperback
Pages: 216
₹250.00 Original price was: ₹250.00.₹225.00Current price is: ₹225.00.
Related products
-
इरफान खान | Irrfan Khan
₹300.00Original price was: ₹300.00.₹270.00Current price is: ₹270.00. Add to cart -
Self Help
मनःशक्ती वाढवा | Energize Your Mind
₹250.00Original price was: ₹250.00.₹225.00Current price is: ₹225.00. Add to cart -
Books on Books
Aatmaprakash | आत्म-प्रकाश
₹450.00Original price was: ₹450.00.₹400.00Current price is: ₹400.00. Add to cart -
Finance
The Psychology of Money (Marathi) | पैशाचे मानसशास्त्र
₹250.00Original price was: ₹250.00.₹225.00Current price is: ₹225.00. Add to cart -
Culture
Jadui Vastav | जादुई वास्तव
₹250.00Original price was: ₹250.00.₹225.00Current price is: ₹225.00. Add to cart -
Biography & Autobiography
Vachat Sutalo Tyachi Goshta: Eka Lekhakachya Granthvedhachi Safar | वाचत सुटलो त्याची गोष्ट: एका लेखकाच्या ग्रंथवेडाची सफर
₹300.00Original price was: ₹300.00.₹270.00Current price is: ₹270.00. Add to cart