बुद्ध धर्माचा प्रसार चीन देशात झाला आणि ध्यान शब्दाचं रूपांतर चान झालं, पुढे त्याचं जपानी भाषेत रूपांतर झालं झेन! बुद्धानं एका विशिष्ट पद्धतीने ध्यानाद्वारे ज्ञानप्राप्ती करण्याचं शिकवलं. यंत्र आणि माणूस बनत चालेल्या माणसाला माणूस बनवण्याची शक्यता झेन मध्ये आहे. स्वत:च्या मुळाशी असलेल्या वैश्विक एकत्वापर्यन्त घेऊन जाण्याची शक्यता झेनमध्ये आहे. विशेष म्हणजे झेन कोणत्याच प्रश्नांची उत्तर देत नाही. नितीन भारत वाघ लिखि ‘झेन’ ही पुस्तक छोट्या छोट्या लघुबोधकथांचा संग्रह आहे. यात प्रश्न आणि उत्तर असा सरळ व्यवहार आहे. या कथा सामान्य आयुष्यातल्या रोजच्या काही घटना, प्रश्न यांवर भाष्य करतात. बोधिसत्व, बुद्ध, गुरु अशा प्रतिमा या कथांच्या मध्यभागी आहेत. एखाद्या अवस्थेत मार्ग सुचत नसेल, गोंधळ असेल तर झेन कथा लहान पण लख्ख दृष्टी देऊ शकते, या कथांच्या मागे हाच विचार दिसतो.
झेन | लेखक: नितीन भारत वाघ