संगीत म्हणजे स्वरांचा आणि स्पंदनांचा खेळ! अतिशय मोहक असे भावविश्व! संगीत न आवडणारी व्यक्ती विरळाच. संगीत कुठल्याही प्रकारचं असो… शास्त्रीय, उपशास्त्रीय, भावसंगीत, चित्रपटसंगीत, लोकसंगीत, पाश्चात्त्य संगीत – ते कुठल्या ना कुठल्या वळणावर आपल्या मनाशी, हृदयाशी संवाद साधतंच. भारतीय शास्त्रीय संगीत तर अशा अनेक संगीतप्रकारांची गंगोत्रीच! सागरासारखं विशाल, गहिरं असं हे संगीत केवळ अलौकिक! एक-एक राग म्हणजे सुंदर स्वरशिल्प! नेहा लिमये या अत्यंत बुद्धिमान, बहुश्रुत अशा लेखिकेनं शास्त्रीय राग उलगडून दाखवताना सिनेगीतांचा, भावगीतांचा उल्लेख केला आहे. ज्यामुळे सर्वच श्रोत्यांना अन् वाचकांनाही वेगळा अनुभव येईल आणि हे पुस्तक अनंत विचारधारांनी संवेदनशील रसिकांची मनं भिजवेल, याची मला खात्री आहे.
- सावनी शेंडे