शत्रुराष्ट्रातही लोकप्रियता मिळवणारा आणि जगभराच्या तरुणाईला आजही भुरळ घालणारा अर्नेस्टो चे गव्हेरा या क्रांतिकारकाच्या देशाटनावर आधारित त्याच्या अत्यंत मनोरंजक अशा ‘द मोटरसारकल डायरीज’ या प्रसिद्ध पुस्तकाचा रसाळ अनुवाद. अर्नेस्टो ‘चे’ गव्हेरा, हा एल चे किंवा फक्त चे म्हणून ओळखला जाणारा, एक मार्क्सवादी क्रांतिकारक, चिकित्सक, लेखक, स्वप्निल विचारवंत, गनिमी नेता, मुत्सद्दी राजकारणी आणि लष्करी सिद्धान्तकार होता. तो क्यूबन क्रांतीचा एक प्रमुख नेता होता. त्याच्या मृत्यूनंतर गव्हेरा हा जगातल्या सगळ्याच तरुणांच्या गळ्यातला ताईत झाला. इतका की, त्याचे फोटो असलेले टी-शर्ट्स आणि कॅप्स आजही तरुणांच्या अंगावर पाहायला मिळतात. या विस्तारित आवृत्तीमध्ये २३ वर्षीय अर्नेस्टोनं अमेरिका खंडाच्या प्रवासात घेतलेले फोटो आणि नकाशे, अलैदा गव्हेरा-मार्च या त्याच्या मुलीची प्रस्तावना, सुप्रसिद्ध लॅटिन अमेरिकन कवी सिंटिओ व्हिटियर यानं केलेलं या पुस्तकाचं रसग्रहण आणि ‘चे’नं त्याच्या सुरुवातीच्या वर्षांत मेडिकलच्या विद्यार्थ्यांसमोर केलेलं भावपूर्ण भाषण या सगळ्यांचा समावेश आहे.
“Premchand : Lekhanicha Shiledar | प्रेमचंद लेखणीचा शिलेदार” has been added to your cart. View cart
The Motorcycle Diaries | द मोटरसायकल डायरीज
Related products
-
Biography & Autobiography
Avliye Aapta: Avval Ani Assal | अवलिये आप्त: अव्वल आणि अस्सल
₹200.00Original price was: ₹200.00.₹180.00Current price is: ₹180.00. Add to cart -
Biography & Autobiography
Vachat Sutalo Tyachi Goshta: Eka Lekhakachya Granthvedhachi Safar | वाचत सुटलो त्याची गोष्ट: एका लेखकाच्या ग्रंथवेडाची सफर
₹300.00Original price was: ₹300.00.₹270.00Current price is: ₹270.00. Add to cart -
Biography & Autobiography
Chin. Tryam. Khanolkaranchya Shodhat | चिं. त्र्यं. खानोलकरांच्या शोधात
₹350.00Original price was: ₹350.00.₹315.00Current price is: ₹315.00. Add to cart -
Biography & Autobiography
Susat George | सुसाट जॉर्ज
₹250.00Original price was: ₹250.00.₹225.00Current price is: ₹225.00. Add to cart -
Biography & Autobiography
Premchand : Lekhanicha Shiledar | प्रेमचंद लेखणीचा शिलेदार
₹375.00Original price was: ₹375.00.₹338.00Current price is: ₹338.00. Add to cart