Vastav Rupvani: January-February-March 2023 | वास्तव रूपवाणी: जानेवारी-फेब्रुवारी-मार्च २०२३

वास्तव रूपवाणी
अंक: जानेवारी-फेब्रुवारी-मार्च २०२३
संपादक: डॉ.संतोष पाठारे
संस्थापक संपादक: सुधीर नांदगांवकर (१९९३ ते २०१४)
साहित्यप्रकार: मासिक
प्रकाशन कालावधी: त्रैमासिक

125.00

125.00

सिनेमा, फिल्म, मूव्ही, चित्रपट या शब्दांसाठी रवीन्द्रनाथ टागोरांनी एक अस्सल भारतीय शब्द वापरला-रूपवाणी-किती नेमका आणि अन्वयार्थक शब्द! रूप या शब्दातून या माध्यमाची दृश्यात्मकता तर वाणी या शब्दातून त्याचे ध्वनिरूप सूचित होते. त्यातूनच या चित्रपट अभ्यासविषयक नियतकालिकाचे नामाभिधान झाले-वास्तव रूपवाणी.
वास्तव रूपवाणी हे प्रभात चित्र मंडळाचे चित्रपट अभ्यासविषयक मासिक गेली २८ वर्षे सातत्याने चालू आहे. चित्रपट संस्कृती खऱ्या अर्थाने रुजायची असेल, तर स्थानिक भाषांतून व्यवहार झाला पाहिजे, हे लक्षात घेऊन सुधीर नांदगावकर यांनी ‘वास्तव रूपवाणी’ या मासिकाची १९९४ मध्ये सुरुवात केली. अमोल पालेकर, अरुण खोपकर, श्यामला वनारसे, विजय तेंडुलकर, रत्नाकर मतकरी, अशोक राणे, सुधीर नांदगांवकर, विजय पाडळकर, अनिल झणकर, रेखा देशपांडे ते थेट श्रीकांत बोजेवार, सुषमा दातार, गणेश मतकरी, अभिजित रणदिवे, संतोष पाठारे, अभिजित देशपांडे आदी अनेक जाणकारांनी ‘रूपवाणी’तून चित्रपटविषयक महत्त्वपूर्ण लेखन केले आहे.
गेली २८ वर्षे चित्रपटकलेचा जाणता रसिक व अभ्यासक घडवण्याचे काम ‘वास्तव रूपवाणी’ करत आहे. काळानुरूप अधिक लोकांपर्यंत कसे पोचेल आणि चित्रपट कलेविषयी साक्षरता कशी वाढेल या उद्देशाने या अंकाचे स्वरूप अधिक व्यापक होत आहे.

महाराष्ट्रभरातील फिल्म सोसायटी सदस्य, महाविद्यालये-विद्यापीठे यांतील सिनेमा विषयाचे प्राध्यापक-विद्यार्थी-अभ्यासक, चित्रपट प्रेमी महाराष्ट्रातील जाणते कलारसिक-सर्वांसाठी उपयुक्त असा दस्तऐवज. जरूर सदस्य व्हा आणि आपली प्रत राखीव ठेवा.

या अंकांचा अनुक्रमणिका फोटो दिलेला आहे.

वास्तव रुपवाणीचे सभासद होण्यासाठी इथे वार्षिक वर्गणी भरू शकता: https://pustakwalas.online/product/vastav-rupvani-vargni/

प्रकाशन काल: त्रैमासिक

Scroll to Top